ठकीचे
आजोबा
नेपोलिअनचे चरित्र
कपाटात ठेवले. वाटले
पाठवू आजोबांसाठी नागपूरला.
हल्ली ते फार वाचत
नाहीत असे ठाऊक होते तरी वाटले
पुस्तक पाहूनच बरे वाटेल
त्यांना. पुस्तक
अजूनही कपाटातच आहे. साधारण
गेली दहा वर्षे तरी लुडविगचे
नेपोलेअनचे चरित्र मिळाले
तर आण असे ते मला सांगत होते.
आता चरित्र मिळाले
पण उशीर झाला खूपच …
उन्हाळ्याच्या सुट्टीत
अगदी ठरलेला कार्यक्रम असे.
पुण्यात सगळे जमायचे.
आम्ही चार नातवंडे.
त्यात मी एकटीच नात
(म्हणून खास लाडकी
)! कैऱ्या, आंबे
पत्त्यांचे बंगले, आजीने
पुरविलेले खाण्याचे लाड,
रात्री गच्चीत रंगलेले
झब्बुचे डाव; सारे
काही सुंदर,उत्साही
आणि शांत आजच्या भाषेत “डी -
स्ट्रेसिङ्ग “ .
लहान वयातही अतिशय
आकर्षण वाटे ते आजोबांच्या
पुस्तक संग्रहाचे. तत्त्व-ज्ञान
, इतिहास ,उत्तम
कादंबऱ्या, कला अशा
विविध विषयांवरील ग्रंथांचा
अतिशय व्यवस्थित ठेवलेला
खजिनाच! “ही सगळी
लायब्ररी तुझीच आहे” असे
त्यांनी म्हटल्यावर काय आनंद
वाटला होता.
अ
टेल ऑफ टू सिटीज हे त्यांच्या
कपाटातून मी घेतलेले पहिले
पुस्तक. आठवतो अजून
साधा प्रसंग -
आजोबा
: शामिनी, तू
डिकन्सचे (ह्या
नावाचा त्यांचा मराठमोळा
उच्चार माझ्या इंग्रजाळलेल्या
कानांना भलताच गोड वाटला )
अ टेल ऑफ टू सिटीज वाचते
आहेस का?
मी
:हो! (मनात
प्रश्न -ह्यांना
कसे कळले?)
आजोबा
: उत्तम ! सिड्नेय
कार्टन लक्षात रहतो. फ्रेंच
क्रांती, त्यात ते
गिलोटिन चे वर्णन थरारक आहे
. म्हणजे वाचताना
अगदी काटा उभा राहतो . डिकन्स
म्हणजे प्रश्नच नाही ग !
चालू द्या ! छान
!
मी:
(स्वतःवर खुश होऊन )
हो.
आजोबा
: फक्त तू पुस्तक
उलटे ठेवले आहेस. ते
मात्र सांभाळ. विद्रूप
दिसते ग .
ह्या
एकाच प्रसंगातून कौतुक आणि
संस्कार मिळाले .
खाण्यापिण्याच्या
बाबतीतही ते रसिक होते.
जेवताना आमरस हा त्यांचा
लाडका. मी मात्र
कैरी भक्त. कैरी की
आंबा हा आमच्यातला न संपणारा
वाद . जेवण झाल्यावर
रात्री ते अंगणात फेरया मारायचे
तेव्हा गप्पा ह्या सतत सुरूच
असत. अगदी आकाशातला
व्याध , मृगनक्षत्र
ते तत्त्व-ज्ञान
, विविध प्रकारचे
लेखन,संगीत,निसर्ग,
संस्कृती,राजकारण
, माणसामाणसातील
संबंध , अशा अनेक
विषयांवर गप्पा होत . कधीकधी
आजी म्हणायची आज ही बरी तुमच्या
तावडीत सपडली . मग
खाऊ समोर ठेवून स्वतःच्या
गोटात ओढायची .
लेखन,
व्याखाने आणि भेटायला
आलेल्या लोकांशी चर्चा करण्यात
मग्न असलेले आजोबा कधीकधी
आमच्या बरोबरीने आंब्याच्या
झाडावर चढायचे. कधी
म्हणायचे “छान पाऊस पडतो आहे.
आजीला म्हण, थोडी
भजी करतेस का?” कसे
कोणास ठाऊक आम्ही स्वयंपाकघराकडे
जायच्या आत आजी भजी घेऊन यायची
सुद्धा .
संगिताची
त्यांना तेवढीच आवड . शास्त्रीय
संगीत अधिक आवडायचे . पण
काही खास हिंदी गाणी त्यांची
लाडकी . कधी विचारायचे
“तू ‘आयेगा आनेवाला’ ऐकले
आहेस?” महलची सिडी
अजून शोधते आहे त्यांच्यासाठी
. पण आता वेळ टळून
गेली. किंवा त्यांचे
आवडते गाणे : उठाये
जा उनके सितम ! त्यांचे
शब्द अजूनही कानात आहेत:
“ती” अशी जिन्यावरून
येते आणि “तो” असा इथून येतो;
हे नर्गिस आणि दिलीप
कुमार यांच्या भेटीचे वर्णन
ते इतक्या रंजकतेने करीत की
“ती” व “तो”कोण हे विचारावे
असे वाटले नाही . “अंदाज”
सिनेमा त्यांच्या अंदाजात
अधिक खुलायचा .
अजून अशीच एक आठवण .
ते अमेरिकेला निघाले
होते. तेव्हा त्यांना
सोडायला सगळे विमानतळावर
जमलो होतो. माझे वय
अगदी अल्लड. वाटले,
आजी रडेल आता एकदम
फिल्मी स्टाइल मध्ये !
सगळ्यांचा निरोप घेऊन
ते आजी जवळ आले. म्हणाले
“मी गीता बरोबर नेतो आहे.
काही वाटले तर वाचीन
.” मोजक्या शब्दांत
किती सांगितले . नजरेतून
किती दिलासा दिला हे आज जाणवते
. भावना व्यक्त
करण्यातील सूक्ष्मता आजच्या
पिढीने शिकण्यासारखी आहे.
आमची आजी दोन महिन्यांपूर्वी
गेली आणि आता आजोबाही गेले.
ती पिढीच सरली . एकदम
प्रौढ आणि पोरके झाल्यासारखे
वाटते . पण ते आमच्या
आसपासच आहेत त्यांनी दिलेल्या
संस्कारांमधून , विचारांमधून
आणि त्यांनी लिहिलेल्या अमोल
ग्रंथांमधून. त्यांच्या
जीवनाच्या अमृतानुभवात आम्ही
साक्षीदार होतो हेच आमचे भाग्य
.
जितक्या सुन्दर आठवणी तिथकाच सुन्दर लेख लिहिला अहेस. तुझे आजोबा खरच अविस्मरणीय़ आहेत. खूप छान वाटले हे वाचून.
ReplyDeleteMay his ever-jovial soul rest in peace. In the company of your granny's.
A beautiful and touching tribute! I never knew you could write such wonderful Marathi as well.. I guess it's all in the genes. Khair, asech lihit raha..
ReplyDelete