Skip to main content

Posts

Showing posts from April, 2013

supervision

Supervision I entered a room filled with a silence full of anticipation and anxiety, penetrated by  nervous clicking of the pen, tapping of feet, a rummage through the bag for the elusive hall-ticket/pencil/calculator/"lucky pen". My arrival was burdensome for many but a welcome relief for some. Mechanically, I started with the instructions:  an order to keep away their books, cellphones(switched off),notebooks and bags, a gentle reminder to use a black pen and a request to "double check" their hall tickets.   As soon as the question paper was distributed one witnessed familiar reactions: a fearful staring at the wall, or a heavy sigh of relief, a slight chuckle, a devilish smirk maybe,a last minute prayer,or a helpless and hopeless whistle of despair...all these set the mood in the exam hall.  Then, began the ordeal. The meticulous signing of the answer books, (first and foremost: an eye for signatures), a scrutiny of the hall ticket coupled w

ठकीचे आजोबा

ठकीचे आजोबा नेपोलिअनचे चरित्र कपाटात ठेवले . वाटले पाठवू आजोबांसाठी नागपूरला . हल्ली ते फार वाचत नाहीत असे ठाऊक होते तरी वाटले पुस्तक पाहूनच बरे वाटेल त्यांना . पुस्तक अजूनही कपाटातच आहे . साधारण गेली दहा वर्षे तरी लुडविगचे नेपोलेअनचे चरित्र मिळाले तर आण असे ते मला सांगत होते . आता चरित्र मिळाले पण उशीर झाला खूपच … उन्हाळ्याच्या सुट्टीत अगदी ठरलेला कार्यक्रम असे . पुण्यात सगळे जमायचे . आम्ही चार नातवंडे . त्यात मी एकटीच नात ( म्हणून खास लाडकी )! कैऱ्या , आंबे पत्त्यांचे बंगले , आजीने पुरविलेले खाण्याचे लाड , रात्री गच्चीत रंगलेले झब्बुचे डाव ; सारे काही सुंदर , उत्साही आणि शांत आजच्या भाषेत “डी - स्ट्रेसिङ्ग “ . लहान वयातही अतिशय आकर्षण वाटे ते आजोबांच्या पुस्तक संग्रहाचे . तत्त्व - ज्ञान , इतिहास , उत्तम कादंबऱ्या , कला अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा अतिशय व्यवस्थित ठेवलेला खजिनाच ! “ ही सगळी लायब्ररी तुझीच आहे” असे त्यांनी म्हटल्यावर काय आनंद वाटला होता . अ टेल ऑफ टू सिटीज हे त्यांच्या कपाटातून मी घेतलेले पहिले पुस्तक . आठवतो अजून साधा प्रसंग - आजोबा : शाम