Skip to main content

ठकीचे आजोबा



ठकीचे आजोबा

नेपोलिअनचे चरित्र कपाटात ठेवले. वाटले पाठवू आजोबांसाठी नागपूरला. हल्ली ते फार वाचत नाहीत असे ठाऊक होते तरी वाटले पुस्तक पाहूनच बरे वाटेल त्यांना. पुस्तक अजूनही कपाटातच आहे. साधारण गेली दहा वर्षे तरी लुडविगचे नेपोलेअनचे चरित्र मिळाले तर आण असे ते मला सांगत होते. आता चरित्र मिळाले पण उशीर झाला खूपच …
उन्हाळ्याच्या सुट्टीत अगदी ठरलेला कार्यक्रम असे. पुण्यात सगळे जमायचे. आम्ही चार नातवंडे. त्यात मी एकटीच नात (म्हणून खास लाडकी )! कैऱ्या, आंबे पत्त्यांचे बंगले, आजीने पुरविलेले खाण्याचे लाड, रात्री गच्चीत रंगलेले झब्बुचे डाव; सारे काही सुंदर,उत्साही आणि शांत आजच्या भाषेत “डी - स्ट्रेसिङ्ग “ . लहान वयातही अतिशय आकर्षण वाटे ते आजोबांच्या पुस्तक संग्रहाचे. तत्त्व-ज्ञान , इतिहास ,उत्तम कादंबऱ्या, कला अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा अतिशय व्यवस्थित ठेवलेला खजिनाच! “ही सगळी लायब्ररी तुझीच आहे” असे त्यांनी म्हटल्यावर काय आनंद वाटला होता.
अ टेल ऑफ टू सिटीज हे त्यांच्या कपाटातून मी घेतलेले पहिले पुस्तक. आठवतो अजून साधा प्रसंग -

आजोबा : शामिनी, तू डिकन्सचे (ह्या नावाचा त्यांचा मराठमोळा उच्चार माझ्या इंग्रजाळलेल्या कानांना भलताच गोड वाटला ) अ टेल ऑफ टू सिटीज वाचते आहेस का?
मी :हो! (मनात प्रश्न -ह्यांना कसे कळले?)
आजोबा : उत्तम ! सिड्नेय कार्टन लक्षात रहतो. फ्रेंच क्रांती, त्यात ते गिलोटिन चे वर्णन थरारक आहे . म्हणजे वाचताना अगदी काटा उभा राहतो . डिकन्स म्हणजे प्रश्नच नाही ग ! चालू द्या ! छान !
मी: (स्वतःवर खुश होऊन ) हो.
आजोबा : फक्त तू पुस्तक उलटे ठेवले आहेस. ते मात्र सांभाळ. विद्रूप दिसते ग .

ह्या एकाच प्रसंगातून कौतुक आणि संस्कार मिळाले .

खाण्यापिण्याच्या बाबतीतही ते रसिक होते. जेवताना आमरस हा त्यांचा लाडका. मी मात्र कैरी भक्त. कैरी की आंबा हा आमच्यातला न संपणारा वाद . जेवण झाल्यावर रात्री ते अंगणात फेरया मारायचे तेव्हा गप्पा ह्या सतत सुरूच असत. अगदी आकाशातला व्याध , मृगनक्षत्र ते तत्त्व-ज्ञान , विविध प्रकारचे लेखन,संगीत,निसर्ग, संस्कृती,राजकारण , माणसामाणसातील संबंध , अशा अनेक विषयांवर गप्पा होत . कधीकधी आजी म्हणायची आज ही बरी तुमच्या तावडीत सपडली . मग खाऊ समोर ठेवून स्वतःच्या गोटात ओढायची .
लेखन, व्याखाने आणि भेटायला आलेल्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न असलेले आजोबा कधीकधी आमच्या बरोबरीने आंब्याच्या झाडावर चढायचे. कधी म्हणायचे “छान पाऊस पडतो आहे. आजीला म्हण, थोडी भजी करतेस का?” कसे कोणास ठाऊक आम्ही स्वयंपाकघराकडे जायच्या आत आजी भजी घेऊन यायची सुद्धा .
संगिताची त्यांना तेवढीच आवड . शास्त्रीय संगीत अधिक आवडायचे . पण काही खास हिंदी गाणी त्यांची लाडकी . कधी विचारायचे “तू ‘आयेगा आनेवाला’ ऐकले आहेस?” महलची सिडी अजून शोधते आहे त्यांच्यासाठी . पण आता वेळ टळून गेली. किंवा त्यांचे आवडते गाणे : उठाये जा उनके सितम ! त्यांचे शब्द अजूनही कानात आहेत: “ती” अशी जिन्यावरून येते आणि “तो” असा इथून येतो; हे नर्गिस आणि दिलीप कुमार यांच्या भेटीचे वर्णन ते इतक्या रंजकतेने करीत की “ती” व “तो”कोण हे विचारावे असे वाटले नाही . “अंदाज” सिनेमा त्यांच्या अंदाजात अधिक खुलायचा .
अजून अशीच एक आठवण . ते अमेरिकेला निघाले होते. तेव्हा त्यांना सोडायला सगळे विमानतळावर जमलो होतो. माझे वय अगदी अल्लड. वाटले, आजी रडेल आता एकदम फिल्मी स्टाइल मध्ये ! सगळ्यांचा निरोप घेऊन ते आजी जवळ आले. म्हणाले “मी गीता बरोबर नेतो आहे. काही वाटले तर वाचीन .” मोजक्या शब्दांत किती सांगितले . नजरेतून किती दिलासा दिला हे आज जाणवते . भावना व्यक्त करण्यातील सूक्ष्मता आजच्या पिढीने शिकण्यासारखी आहे.
आमची आजी दोन महिन्यांपूर्वी गेली आणि आता आजोबाही गेले. ती पिढीच सरली . एकदम प्रौढ आणि पोरके झाल्यासारखे वाटते . पण ते आमच्या आसपासच आहेत त्यांनी दिलेल्या संस्कारांमधून , विचारांमधून आणि त्यांनी लिहिलेल्या अमोल ग्रंथांमधून. त्यांच्या जीवनाच्या अमृतानुभवात आम्ही साक्षीदार होतो हेच आमचे भाग्य .









Comments

  1. जितक्या सुन्दर आठवणी तिथकाच सुन्दर लेख लिहिला अहेस. तुझे आजोबा खरच अविस्मरणीय़ आहेत. खूप छान वाटले हे वाचून.

    May his ever-jovial soul rest in peace. In the company of your granny's.

    ReplyDelete
  2. A beautiful and touching tribute! I never knew you could write such wonderful Marathi as well.. I guess it's all in the genes. Khair, asech lihit raha..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Paus

किती वाट पाहिली तुझी? वाटले, येतोस की नाही.आकाशात ढग दाटले की चाहूल लागते तुझी.मंद गार वारा आणि त्यावर स्वार होऊन येतात त्या धारा. कधी शांत ,अबोध रिमझिम तर कधी दमदार बरसात, तर कधी गंभीर संततधार अशी अनेक रुपं तुझी! कधी थोडा विसावा धेतलास, तर आसमंतात शांतता पसरते. लहानपणी छप्परावर नाचणारा तू, आजही साद घालतोस.छोट्या छोट्या कागदी होड्या बनवून त्या साचलेल्या डबक्यात सोडायच्या. बुडणार त्या हे माहिती असायचे , पण त्यांच्या क्षणभर तरंगण्याचा केवढा आनंद वाटत असे. तुझे स्वागत आईनं केलेल्या भजीने व्हायचे. त्या अल्लड वयात तुझ्या तुषारांचा रोमांच! उफाळून आलेला समुद्र आणि मेघांनी मोहरलेले डोंगर ! कधी अचानक दिसलेले इंद्रधनुष.सगळे अद्भुत. प्रणयाच्या क्षणांना तुझ्या संगीताची साथ! तुझ्या धास्तीने लोकलचा केलेला प्रवास आणि कितीही पैसे मोजून घराकडे घेतलेली धाव,मग  आलं घालून चहा आणि सगळ्यांची विचारपूस. तुझ्या बरोबरीचे अस्थानी पराक्रम आणि तद्नंतर मिळालेला  औषधांचा खुराक,हे कधी चुकले नाही . घरी एकटेच असताना ,तू सोबत करतोस की कुठल्या अनामिक भीतीला निमंत्रण देतोस, हे कळलेच नाही . जितका अल्लहाददाय...

To Friendship!

Thank you for being: My friend My guide My confidante My colleague My student  Thanks for :  stealthily making lemon juice at midnight  coming on long bicycle rides on the IITB campus  taking classical music lessons with me  making me read and forcing me to write  bumping into me at Strand  fixing train timings and screwing them, too  motivating me to attend Sanskrit lectures discussing "Tom Joad" with me learning French and tolerating my dismal linguistic skills translating "tum se hi" singing "Tere haath mein" from Fanaa listening to the endless drone that are my lectures sharing my Kafka and Sheldon Cooper obsession becoming the victims for my culinary experiments sharing a samosa paav with me losing your mind over Paradise Lost parsing sentences scanning poetry looking for SPOCA and glides calling Gus a scoundrel and taking that as a  complement sharing a silly chain with me doin...

Still Waters

T hey throng during weekends T hey laugh,click, and “ like ”. I wait and watch the time go by; Wait till the swamp shall devour me. Sad and still the waters hide the hideous face of Nature; Lonely, bare and withering I stand waiting for the Great Spirit To come crashing down on me. I glance at the mass that’s left Waiting to go down. The sore begins to fester and rot. Slow and agonizing water seeps into me. Time slips by. I cling, clutch, sink, and die.